एरंडपे येथे लोक जगताहेत हलाखीचे जीवन!

गारगोटी (प्रतिनिधी) एरंडपे (ता. भुदरगड) एरंडपे ग्रामपंचायत क्षेत्रातील  धनगरवाड्यांला आजही रस्ता, पूल नसल्यामुळे अन्य भागाशी संपर्क तुटलेला आहे. त्यातच वनखात्याच्या जाचक नियमांमुळे मूळ भूमीपूत्र आज अत्यंत हलाखीचे जीवन जगत असल्याचे दिसत आहे.  ज्यावेळी १९७२ ला ग्रुप ग्रामपंचायतीची स्थापना झाली त्यावेळी या गावाला गावचा सरपंच भेटला. वाड्यावरील जवळ जवळ ८० टक्के इतका भाग जंगलानी व्यापल्यामुळे शिक्षण, व्यापार आणि अन्य सुविधांपासून हा भाग वंचित राहिला.

शेती हाच प्रमुख व्यवसाय असलेल्या या भागात मागच्या वीस पंचवीस वर्षात कोणत्याच सुविधा झाल्या नाहीत.एरंडपे गावात प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा झाली , वाचनालय आले,  शेती वाडीतील  रस्ते  झाले, परंतू अजूनही धनगर वाड्यावरील फोंडे,  येडगे,  पटकारे, वस्तीतील ही लोक विकासाच्या प्रतीक्षेत आहेत.एरंडपे धनगरवाड्यावर जायला रस्ता नाही.

 चारचाकी गाड्या वाड्यावर जात नाहीत. वाड्यावर २० ते २५ घरे आहेत. बदलत्या परिस्थितीचा लाभ घेत वाड्यावरील युवकांनी दुचाकी,  वाहने घेतलेली आहेत. परंतु वाड्यापर्यंत जायला रस्ता नसल्यामुळे वाहने अर्ध्यावर ज्या ठिकाणी रस्ता संपतो त्या ठिकाणी ठेवावी लागतात.

अशा या भागातील लोकांच्या तक्रारी आहेत. आठवड्यातील बरेच दिवस पिठाच्या गिरणीत दळपासाठी  तसेच उदरनिर्वाहा साठी लागणाऱ्या अनेक कारणांसाठी येथील महिलांना अडीच -तीन किलोमीटर अंतर पायी  चालत यावे लागते वाड्यावरून गावात येताना पावसाळ्यात अनेक वडे-नाले वाहत असून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी मुले याच संकटातून एरंडपे येथे जात असतात. तसेच रस्त्याची सोय  व वाहन जात नसल्यामुळे येथील आपत्कालीन परिस्थितीत आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी घोंगडी डोली (पाळणा) करून अडीच तीन किलोमीटर  अनंतरावरून  नेले जाते, नुकतेच एरंडपे गावातील (धनगरवाडा) सुनिता सचिन फोंडे (वय 24) यांना  प्रसूतीचा त्रास सहन करावा लागला,धनगर वाड्यावर रुग्णवाहिका जात नसल्याने प्रसूतीसाठी पाळणा करून(घोंगडी डोली)मधून अडीच- तीन किलोमीटर पायी नेण्यात आले, खूप उशीर झाल्याने बाळ पोटात घुसमटून मरण पावले सुदैवानं  सुनिता वाचली पण तिचे बाळ नाही वाचले ,याअगोदर वाड्यावर वाहन जायला रस्ता व्हावा म्हणून युवासेनेच्या श्रावण पाटील आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी  बरेच प्रयत्न केले. परंतु त्यांना अद्याप यश मिळत नाही.  वनखात्याच्या निर्बंधांमुळे रस्त्याचे काम व डांबरीकरण होत नाही.  निवडणुकीच्या वेळ नवनवीन आमिषे दाखविली जातात. पदरी मात्र काहीच पडत नसल्याची खंत युवासेनेच्या श्रावण पाटील, सुशांत फोंडे ,सगु फोंडे, वनराज फोंडे, पांडुरंग फोंडे, लहू पाटील आणि  वाड्यावरील अन्य लोकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *