शाळांकडून फी साठीचा तगादा थांबवा

अन्यथा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू; कोल्हापूर युवासेनेचा इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आजची परिस्थिती बघता कोविड १९ मुळे सर्व पालक व सर्व नागरिकांचे रोजगार ठप्प झालेले आहेत. पण काही शाळांकडून गेल्यावर्षी फी जमा केली नाही म्हणून त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन लिंक पाठवणे मध्ये अडथळा करणे  अनेक पालकांना फी साठी वाटेल तस बोलणे असे अनेक प्रकार काही शाळांकडून होत आहेत. म्हणूनच आज युवा सेना कोल्हापूर जिल्हा व युवती सेना यांच्यावतीने शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांना हे प्रकार थांबावेत यासाठीचे निवेदन देण्यात आले. व लवकरात लवकर प्रत्येक शाळांची बैठक घेऊन हा विषय मार्गी लावावा असे सांगण्यात आले.

 आपल्या कडून तशी योग्य उपाययोजना झाली नाही तर आम्ही शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे तशी तक्रार करू असा इशारा कोल्हापूर जिल्हा युवा सेना व युवती सेना यांच्यातर्फे देण्यात आला यावेळी उपस्थित युवा सेना जिल्हाप्रमुख मंजीत माने, युवती सेनेच्या समीना बागवान शितल कालगोटे, त्याचबरोबर युवा सेनेचे उपशहर प्रमुख शेखर बारटक्के, वैभव जाधव कुणाल शिंदे, तसेच युवा सेनेचे विभाग प्रमुख मंगेश चितारे, शुभम मोरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *