खासदार संभाजीराजे यांनी ऍट्रॉसिटीच्या संदर्भातील भूमिका स्पष्ट करावी : प्रा. सुकुमार कांबळे

सांगली (प्रतिनिधी) :मराठा आरक्षण मागणीसाठी या पूर्वी लाखोंचे मोर्चे निघाले त्या मोर्च्यात अनेक मागाण्यांपैकी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा (ऍट्रॉसिटी) रद्द करा अशी मागणी होती.  त्यामुळे सध्या राजेंच्या नेतृत्वाखाली जे मोर्चे निघतील त्या मोर्च्याच्या संदर्भात दलित लोकं संभ्रमात आहेत म्हणून ऍट्रॉसिटीच्या  संदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी त्यानंतरच मराठा आरक्षणाच्या मोर्च्याला पाठिंबा दयायचा  कि नाही हे ठरवता यईल. असे पत्रक डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्रभर दलितांच्यावर जे हल्ले व अन्याय अत्याचार सुरु आहेत. जर खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मोर्च्यात किंवा आंदोलनात ऍट्रॉसिटी  रद्द करा अशी मागणी होणार असेल तर आम्ही कोणत्याही परिस्तितीत या आंदोलनाला पाठिंबा देणार नाही तेव्हा राजेंनी ऍट्रॉसिटीच्या संदर्भातील भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करीत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *