टायर पंक्चर दुरुस्ती व्यवसाय अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा शहर व ग्रामीण टायर पंक्चर वेल्फअर असोसिएशन तर्फे शहर व ग्रामीण भागात टू व्हीलर, फोर व्हीलर टायर पंक्चर दुरुस्ती व्यवसाय अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले.

दीड वर्षापासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सरकारी अधिकारी आरोग्य सेवेतील कर्मचारी, स्टाप डॉक्टर्स, नर्स, पत्रकार पोलीस कर्मचारी हे सर्वजण अविरत झटत आहेत. यांना अत्यावश्यक सेवा मध्ये समाविष्ट केले आहे .

या सेवा बजावणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांचे वाहन पंक्चर झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा सोडून टायर पंक्चर दुरुस्ती व्यवसाय बंद आहे. तेव्हा टायर पंक्चर दुरुस्ती व्यवसाय हा अत्यावश्यक सेवा तसेच शासकीय आदेश (जी. आर ) मध्ये समाविष्ट उल्लेख करावा अशी  मागणी करण्यात आली.

निवेदनावर अनिल कोडोलीकर, रियाज डांगे, विक्रम राऊत, सारंग साळुंखे, दत्ताजी कुंभार, सचिन पाटणकर, संदीप हंकारे, सागर माने, सतीश सासणे, आनंद पाटील, संतोष वाडकर, राजू मुजावर, मोमिन अब्दुल, संदीप साळुखे, आकाश कोरवी, समीर शेख, दीपक लांबोरे, उमेश कोळेकर, राजाराम पाटील, अजित मगदूम, बाळू गवळी, युवराज पाटील, सुरेश टिपुगडे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *