“नरेंद्र मोदी प्रचारजीवी ही आहेत”

मुंबई (प्रतिनिधी) : “नरेंद्र मोदी केवळ प्रधानमंत्री नसून ते प्रचारजीवी आहेत. त्यांना कोरोनाच्या परिस्थितीत प्रचार करता आला नसता. त्यामुळे देशातील जनतेला अंधारात ठेवले. केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे असंख्य निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. या सर्व प्रकारावर देशातील विविध न्यायालयांनी देखील ताशेरे ओढलेले आहेत.” असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केलेला आहे.

नाना पटोले हे बुलढाणा जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थीती जाणून घेतली. यांनतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले आहेत की, “कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचा इशारा ऑक्टोबर मध्येच देण्यात आला होता, परंतु केंद्र सरकारने मार्च महिन्यात देश कोरोना मुक्त झाला आहे असे सांगितले आणि निवडणुका प्रचार घ्यायला परवानगी दिली.”

याचसोबत पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, “राज्यातील भाजप पदाधिकारी आणि देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण, कधी एससी-एसटी तर कधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करून राज्यात अस्थिर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य सरकार आज पडणार, उद्या पडणार असल्याचे सांगून ते जनतेची दिशाभूल करीत आहेत” अशी जोरदार टीका देखील नाना पटोले यांनी यावेळी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *