गडहिंग्लजमधून मराठा आरक्षणच्या मोर्चास बहुसंख्येने सहभागी होणार : मराठा समाजाचा निर्धार

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजमधून मराठा आरक्षणच्या मोर्चास प्रचंड संख्येने सहभागी होण्याचा मराठा समाजाचा निर्धार सकल मराठा समाजाची बैठकीत घेण्यात आला. छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली सोळा जूनला कोल्हापूर येथे नर्सरी बागेतील राजर्षि छ.शाहू महाराजांच्या समाधी स्थळापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मराठा आरक्षण मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार करणेत आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळाचे अध्यक्ष किरण कदम होते‌.

  छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वाखाली आर- या पारची लढाई लढायची असून आरक्षण घेतल्याशिवाय सोडायचे नाही असा ठराव यावेळी करण्यात आला. मोर्चाची प्राथमिक तयारी पूर्ण झाली असून १६ जूनला सकाळी ९ वाजता एम.आर.हायस्कूल समोरील यशवंत बझार येथे सर्वांनी जमायचे असून दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून कोल्हापूरकडे रवाना व्हायचे आहे.

यावेळी चंद्रकांत सावंत ,दिग्विजय कुराडे, दिलिप माने,आप्पा शिवणे व नागेश चौगुले यानी विविध सुचना मांडल्या.तर बैठकिला अनिरुद्ध रेडेकर,प्रा. शिवाजीराव भुकेले, प्रा. यशवंत कोले, किरण डोमणे, प्रकाश रोटे, संजय पाटील, युवराज बर्गे, प्रताप सरदेसाई, मनोज पोवार,उत्तम देसाई उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *