एकाच वेळी एकाच व्यक्तीला कोरोना लसीचे दोन डोस!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशामधील अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. अनेकांना कोरोना लसीचा दुसऱ्या डोससाठी स्लॉट मिळत नाहीय. असं असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील ललितपुर जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरण केंद्रावर एक विचित्र घटना घडलीय. या घटनेच्या माध्यमातून लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. येथे एका व्यक्तीला पाच मिनिटांच्या अंतराने करोनाचा दोन लसी देण्यात आल्या आहेत. ही घटना रावरपुर परिसरामधील एका लसीकरण केंद्रावर घडली आहे. या घटनेनंतर लसीकरण केंद्रामध्ये एकच गोंधळ उडाला.

समोर आलेल्या माहितीनुसार बुधवारी या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला लसीचे दोन डोस पाच मिनिटांच्या अंतराने देण्यात आले. या व्यक्तीने ही घटना केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे घडल्याचा आरोप केलाय. लसीकरणासाठी मी गेलो तेव्हा लस देणाऱ्या नर्स एकमेकींशी गप्पा मारत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *