देशात ३,४०३ कोरोनामृत्यूंची नोंद, तर ९१,७०२ नवबाधित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातला कोरोनाचा कहर हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कमी झालेली रुग्णसंख्या कालपासून पुन्हा वाढलेली दिसत आहे. त्याचबरोबर मृतांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे देशवासीयांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ९१ हजार ७०२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता ११ लाख २१ हजार ६७१वर पोहोचली आहे.

देशात काल दिवसभरात एक लाख ३४ हजार ५८० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातल्या कोरोनामुक्तांची एकूण संख्या दोन कोटी ७७ लाख ९० हजार ७३ वर पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *