‘त्यांना’ मुख्यमंत्री पदावरुन हटवल्यास पक्ष कार्यालयासमोर मी आत्मदहन करेन

 पक्षाध्यक्षांना पाठवलं रक्ताने लिहिलेलं हे पत्र मागील आठवड्यामध्ये पाठवण्यात आलं असलं तरी योगींच्या दिल्ली भेटीच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा चर्चेत आलंय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही दिवसांपूर्वीच सोनू ठाकूर हे पत्र पाठवलं असलं तरी योगींच्या दिल्ली भेटीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा या पत्राची चर्चा सुरु झालीय. १ जून रोजी लिहिलेल्या या पत्रामध्ये योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवू नये अशी मागणी सोनूने केल्याचं ‘हिंदुस्तान’ या हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. इतकच नाही तर सोनूने या पत्रामधून धमकी वजा इशारा देताना योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यात आलं तर आपण लखनऊमधील भाजपा कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून आत्मदहन करुन घेईन, असंही सोनूने पत्रात म्हटलं आहे. मी आत्मदहन केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही उत्तर प्रदेशमधील भाजपाच्या नेत्यांची असेल, असंही या पत्रात सोनूने म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून नेतृत्व बदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुढील आठ महिन्यांनी, फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून या निवडणुका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणाऱ्या की उत्तर प्रदेशमध्ये भाजपा एखादा नवीन चेहरा देणार यासंदर्भातील चर्चा रंगू लागल्यात. याच पार्श्वभूमीवर आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. असं असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये योगी समर्थकांनी आपल्या नेत्याच्या पाठीशी उभं राहण्याची तयारी केली असून योगींना पर्याय दिला जाणार का या चर्चांनंतर योगींच्या एका कट्टर समर्थकाने थेट भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये योगींना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याचा प्रयत्न केल्यास आपण आत्मदहन करुन घेऊ असा इशारा समर्थकाने दिलाय.

उत्तर प्रदेश निवडणुकासंदर्भात नुकतीच भाजपाचे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्वाची बैठक पार पडल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये उलटसुटल चर्चांना सुरुवात झालीय. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर राज्यात नेतृत्वबदल होणार का?, योगी विरुद्ध मोदी असा काही वाद आहे का?, या दौऱ्यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळेच कट्टर हिंदुत्ववादी फायब्रॅण्ड नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरक्षपीठाचे प्रमुख योगी आदित्यनाथ यांना भाजपा मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याच्या अफवा राज्यातील राजकीय वर्तुळात आहेत. त्यामुळेच योगी समर्थकांमध्ये भाजपाविरोधात नाराजी दिसून येत आहे. हीच नारजी व्यक्त करातना गोंडा जिल्ह्यातील योगी समर्थक सोनू ठाकूर याने रक्ताने लिहिलेलं पत्र भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांना पाठवलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *