विमानतळ विस्तारीकरणाच्या जमिनीच्या मोजणीच्या कामास प्रारंभ

 मोजणीच्या ठिकाणी खातेदारांची सकाळपासूनच गर्दी ; गडमुडशिंगी महसूल विभागातील पंधराशे  होऊन अधिक खातेदारांना नोटिसा

गोकुळ शिरगाव (प्रतिनिधी) : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या अतिरिक्त चौसष्ठ एकर जमिनीची मोजणी भुमी अभिलेख कार्यालय व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना मार्फत सुरू झाली असून सकाळी  साडे अकराच्या दरम्यान सुरू झालेली  मोजणी  सायंकाळी  सहा वाजेपर्यंत आजच्या मोजणीचे काम सुरू होते. शनिवार (ता. १२) पर्यंत सदर मोजणी सुरू राहणार आहे .

 मोजणीच्या ठिकाणी खातेदारांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. या मोजणीसाठी गडमुडशिंगी महसूल विभागातील पंधराशे  होऊन अधिक खातेदारांना नोटिसा काढण्यात आल्या होत्या . यापैकी बाराशे हून अधिक खातेदारांनी प्रत्यक्ष मोजणी च्या ठिकाणी उपस्थिती दर्शवत आपली मिळकत भूसंपादन यामध्ये समाविष्ट होते की नाही याची शहानिशा केली. परंतु आणखीन दोन दिवस मोजणी प्रक्रिया सुरू राहणार असल्यामुळे याबाबतचे अंतिम चित्र शनिवार नंतरच स्पष्ट होणार आहे. सदर मोजणीसाठी महसूल विभागातील अत्याधुनिक डी जीपीएस व ईटीएस मशीन द्वारे मोजणी करण्यात येत आहे.

सकाळी लवकर मोजणीच्या ठिकाणी खातेदारांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती परंतु मंडल अधिकारी अर्चना गुवळणी व तलाठी संतोष भिउंगडे यांनी सर्व खातेदारांना गर्दी टाळण्यासाठी आपल्या मिळकतीमध्ये थांबण्याच्या सूचना केल्या  दरम्यान मोजणीच्या ठिकाणी उपस्थित खातेदारांना आपल्या संपादित मिळकतींचा मोबदला कसा व किती मिळणार याबाबत संभ्रमावस्था होती. याच वेळी काही खातेदारांनी आपल्या मिळकतींचे योग्य मोबदला न मिळाल्यास प्रकल्पग्रस्त खातेदारांची कृती समिती स्थापन करून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संघर्ष करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी मोजणीच्या ठिकाणी भुमी अभिलेख करवीर चे उपअधीक्षक सुधाकर पाटील, भूकरमापक अमर सोळांकूरकर, सचिन जाधव, नितीन कुंभार, गणेश कांबळे, श्रीमती वंदना बेलकर,  महसूल विभागातील गडमुडशिंगीच्या  युवराज वड्ड व शिपाई शिवाजी कांबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *