३७ जणांचा मृत्यू ; १४९९ पॉझिटिव्ह रुग्ण!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज गुरुवारी १४९९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर ३७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजअखेर १२०४० अॅक्टिव्ह रुग्ण असून १९५० जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज एकूण १४९९ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये आजरा ७१, भुदरगड ५२, चंदगड २७, गडिंग्लज ५३, गगनबावडा ४, हातकणंगले १४५, कागल ६९, करवीर २४०, पन्हाळा १०८, राधानगरी ३६, शाहूवाडी २१, शिरोळ ९२, नगर पालिका नगरपालिका क्षेत्रामध्ये १२०, तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये ४११, तसेच बाहेरील जिल्ह्यातून राज्यातून आलेले रुग्ण ५० आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *