“मिशन संवेदना” उपक्रमास प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या जागतिक महामारीच्या संकटात माणुसकीच्या भावनेतून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सुरु केलेल्या “मिशन संवेदना” या उपक्रमाच्या माध्यमातून आज दिनांक १० जून रोजी शिरोळ पोलीस ठाणे, नरसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान नृसिंहवाडींच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष मेघशाम पुजारी ट्रस्टी प्राध्यापक गुंडू पुजारी व उप विभागीय पोलीस अधिकारी, जयसिंगपूर रामेश्वर बैंजने यांच्या हस्ते नांदणी नाका येथील झोपडपट्टीमध्ये राहत असलेले खडी फोडणारे गरजू व निराधार अशा ७५ कुटुंबांना आठ दिवस पुरेल एवढे ७५ रेशनचे किट वाटप केले. यावेळी पोलीस ठाण्याचे दुय्यम अधिकारी, पोलिस अमलदार व होमगार्ड उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाकडून कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने घालण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दिनांक १० जून २०२१ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मास्कचा वापर न करणाऱ्या एकूण ४१७ व्यक्तीवर कारवाई करून त्यांचेकडून एकूण रकम ६२९००/- रु. इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. तसेच मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर एकूण २०२० खटले दाखल केले असून त्यांचेकडून एकूण रकम २,३३,२००/- रु. इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे अनावश्यक वाहन घेवून फिरणारे ७४ इसमाचेकडील ७४ वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. ०४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १६ स्थापनावर कारवाई करून त्यांचेकडून एकूण रक्कम ७५००/- रु. इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *