विश्वराज चव्हाणला रौप्यपदक

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथील न्यू हॉरिजन सीबीएससी स्कूलचा विद्यार्थी विश्वराज संजय चव्हाण  यांनी मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या डॉ. होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेत कोल्हापूर विभागातून यश संपादन करीत रौप्यपदक पटकावले.

  शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा या उद्देशाने ही परीक्षा घेतली जाते काठिण्यपातळी म्हणून ओळखल्या जाणार्‍या या स्पर्धेसाठी राज्यभरातून पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थी बसतात. ही परीक्षा लेखी, प्रात्यक्षिक कृती संशोधन प्रकल्प व विज्ञान विषयावर सामान्य ज्ञान व मुलाखत अशा चार टप्पातुन घेतली जाते यासाठी विश्वराज यांनी ‘कोविड 19 चे माहिती विश्लेषण व सामाजिक अंतर देखरेख’ या विषयावर प्रकल्प मांडला होता.

यासाठी त्याला मुख्याध्यापिका सुनिता पाटील, श्रीधर पाटील, प्रा.डॉ. अमोल माने ,प्रा.प्रदिप चिंधी यांचे मार्गदर्शन मिळाले. विश्वराज हे महागाव येथील संत गजानन महाराज  शिक्षण समूहाचे संस्थाध्यक्ष अॅड. आण्णासाहेब चव्हाण यांचे नातू व विश्वस्त डॉ. संजय व सुरेखा  चव्हाण यांचे सुपुत्र होय या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *