उजळाईवाडीतील विमानतळ येथे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार दया

करवीर शिवसेनेतर्फे करवीर तालुका उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांना निवेदन

उजळाईवाडी  (प्रतिनिधी) : कोल्हापूर उजळाईवाडीमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळ ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा व गडमडशिंगी मधील नवीन ६४ एकर जमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेत आजच्या चालु बाजारभावाच्या पाचपट जमीन धारकांना दर मिळाला पाहिजे  या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्यावतीने करवीर तालुका प्रमुख राजू यादव व उपतालुकाप्रमुख पोपट दांगट यांच्या नेतृत्वाखाली  करवीर तालुका उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांना देण्यात आले.

उजळाईवाडी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी यापूर्वी अंदाजे ७५० एकर जमीन संपादित केली आहे व परत गडमुडशिंगी मधील वेगवेगळ्या ११ सर्व्ह नंबर मधील जमीन अंदाजे ६४ एकर आपण जवळजवळ १५०७ शेतकऱ्यांना उपअधीक्षक भूमिअभिलेख करवीर यांचेमार्फत नोटीस काढलेल्या आहेत.

तरी यापूर्वी शिवसेनेच्यावतीने २४ ऑक्टोंबर २०१८ रोजी विमान प्राधिकरण अधिकारी यांना निवेदन दिलेले आहे. पण त्यावरती काही कारवाई झाली नाही. तरी या विस्तारीकरणामध्ये प्रामुख्याने जी गावे गडमुडशिंगी, उंचगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, नेर्ली, तामगाव, सांगवडे इत्यादी गांवची व त्या गावातील वैयक्तिक शेतकऱ्यांच्या जमिनी व त्या गावाच्या ताब्यात ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या शासकीय, गायरान जमिनी शासनाने यापूर्वी संपादन केलेल्या आहेत. ज्या त्या जमिनी गेलेल्या गावांच्या हिस्साप्रमाणे विमानतळ ठिकाणी वेगवेगळ्या विभागामध्ये ज्यांच्या त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे अग्रक्रमाने स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून मिळालेच पाहिजेत.

    तसेच गडमुडशिंगी गावची पुन्हा विमान विस्तारीकरणासाठी ६४ एकर जमीन संपादित करण्याचा घाट घातला आहे. तेथे अनेक वर्षापासूनची अंदाजे १०० वर्षापासून लक्ष्मीवाडी वसाहत आहे. तेथील नागरिकांना व ज्यांना नोटीस दिलेले आहेत त्यांना आजच्या चालू बाजार भावाच्या पाचपट दर मिळाला पाहिजे व त्यांना पूर्ण विश्वासात घेतल्याशिवाय व त्यांचे पुनर्वसन केल्याशिवाय, स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करुन लेखी हमी दिल्याशिवाय आम्ही जमीन संपादन प्रक्रिया होऊ देणार नाही.

   तसेच गडमुडशिंगी गावाची जागा अनेक वेळा शासनाने वेगवेगळ्या प्रयोजनासाठी यापूर्वीही संपादित केली आहे. व विमान विस्तारी करणामध्ये ज्यादा जमीन गडमुडशिंगी येथील संपादन केली आहे. परत ६४ एकर संपादन प्रक्रिया चालू आहे. तरी स्थानिक नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी तेथील भूमिपुत्रांना विशेष राखीव कोटा ठेवण्यात यावा.

तरी वरील विषयासंदर्भात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार, परत संपादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये तेथील शेतकऱ्यांना आजच्या चालू बाजार भावाच्या पाचपट दर व त्यांचे पुनर्वसन या प्रमुख मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात. अन्यथा शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन पुढील टप्प्यात आम्हास घ्यावे लागेल आणि आम्ही ते घेणारच याची प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी अन्यथा संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी. या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्यावतीने देण्यात आले.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपतालुकाप्रमुख पोपट दांगट, तालुकाप्रमुख विनोद खोत, अपंग सेना तालुका प्रमुख संदीप दळवी,युवासेना उपतालुकप्रमुख प्रफुल्ल घोरपडे, विभाग प्रमुख उत्तम आडसुळ, विभाग प्रमुख महादेव खोचगे, बाबुराव पाटील, बाळासाहेब नलवडे,राहुल गिरुले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *