जख्खेवाडी येथील प्राथमिक शाळेची भिंत पाडल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा !

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : जख्खेवाडी(ता.गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेची भिंत बेकायदेशीर पाडल्या प्रकरणी तिंघावर गुन्हा दाखल झाला असून उत्तम तुकाराम पन्हाळकर, अमोल उत्तम पन्हाळकर, दर्शन प्रशांत पन्हाळकर (सर्व राहणार जख्खेवाडी )अशी तिघांची नावे आहेत.


अधिक माहिती अशी की जख्खेवाडी येथील उत्तम तुकाराम पन्हाळकर,अमोल उत्तम पन्हाळकर, दर्शन प्रशांत पन्हाळकर यांनी संगनमत करून प्राथमिक विद्यामंदिर इमारतीस असलेल्या संरक्षण भिंतीचे पश्चिमेकडील अंदाजे तीस फूट लांबीची भिंत बेकायदेशीररीत्या पाडून सरकारी मालमत्तेचे आंदाजे 20,000/- चे नुकसान केले आहे.अशी फिर्याद मुख्याधीपिका मालुताई जाधव यांनी गडहिंग्लज पोलीसात दिली आहे.त्यानुसार गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास हेडकॉंस्टेबल भैरू मुळीक करीत आहेत.

One thought on “जख्खेवाडी येथील प्राथमिक शाळेची भिंत पाडल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *