नांगनुरच्या कांबळे कुटूंबाला भाजपतर्फे मदतीचा हात…

गडहिंग्लज प्रतिनिधी:
गेल्या ६ दिवसा पूर्वी गडहिंग्लज तालुक्यातील नांगनुर येथील कांबळे कुटुंबातील संगीता , गिरीजा, अजित ही मंडळी मुगळी ता. गडहिंग्लज येथे कामानिमित्य गेली होती. काम पूर्ण करून ते परत आपल्या गावी नांगनुर येथे निघाली. पाऊस सुरू झाल्याने कुठेतरी आसरा घ्यावा म्हणून एका पोल्ट्रीच्या भिंतीकडेला थांबली इतक्यात जोराची वीज पडून ही भिंत कोणालाही कळायच्या आत कोसळली आणी या भिंती खाली गीरीजा, संगीता, व अजित, ही तिघेही गाडली जाऊन मयत झाली. या पैकी संगीता यांचे पती अर्धांगवायूने पीडीत आहेत त्यांना ६ मुली व १ मुलगा तर गीरीजा यांच्या पतीचे निधन होऊन काहीच दिवस झाले त्यांना २ मुले आहेत . या दुर्देवी प्रसंगामुळे संगीता यांची मुले आईविना पोरकी तर गिरीजा यांची २ मुले आनाथ झाली. खरे तर हा दुर्देवी प्रसंग कोणा वरती ही येऊ नये. पण काळाने घातलेला घाला कोणीही रोखु शकत नाही..


या घटनेचा बातम्या वृत्तपत्रानुन प्रकाशीत झाल्या. या बातम्या भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष संतोष उर्फ आप्पा लाड यांच्या वाचनात आल्या. श्री. लाड यांनी आपल्या व्यापारी आघाडीच्या प्रमुख पदाधीका-यांना ही गोष्ट सांगीतल्यानंतर या कुटुंबाला मदत करण्याचा संकल्प त्यांनी केला.
भाजपाच्या ” सेवा हेच संघटन ” या घोषणेप्रमाणे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रकांत दादा पाटील यांच्या १० जुन रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री लाड व त्यांचे सहकारी जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे, धनंजय शिंदे, विशाल शिराळकर यांनी आज नांगनूर येथे येऊन या कुटूंबाला रोख रक्कम व जिवनावश्यक वस्तुंचे वाटप केले.
यावेळी भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील,सरपंच सविता कांबळे,उपसरपंच विकास मोकाशी, किरण मोकाशी सुनील कासकर,मारुती कांबळे,संदिप रोटे,रमेश कांबळे,आकाश कांबळे, राकेश कांबळे,माणिक उपाध्ये, सुरेश सुतार, लखन कुंभार,भीमसेन रेडकर यांचे सह कार्यकर्ते उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *