माझा विद्यार्थी माझी जबाबदारी” अभियानाअंतर्गत 306 कुटूंबाची तपासणी

कोल्हापूर प्रतिनिधी : “माझा विद्यार्थी माझी जबाबदारी” या अभियानाअंतर्गत बुधवारी शहरातील 306 व्याधीग्रस्त असलेल्या बालकांच्या कुटुंबाची तपासणी करण्यात आली. यामध्ये 11 पॉझिटिव्ह आढळून आले. महापालिकेच्यावतीने शहरातील व्याधीग्रस्त (Comorbid) बालक असलेल्या कुटुंबांचा सर्व्हे करण्यात येत आहे. व्याधीग्रस्त बालकाच्या कुटुंबातील व्यक्तींची 6 मिनिट वॉक टेस्ट घेऊन आलेल्या निष्कर्षानुसार कोविड टेस्ट, उपचार व संदर्भ सेवा देण्यात येत आहेत.

या अभियानाअंतर्गत 11 प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत बुधवारी व्याधीग्रस्त बालकांच्या कुटुंबातील 1486 नागरीकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 306 कुटुंबातील 935 जणांची वॉकटेस्ट घेण्यात आली. 380 नागरीकांची ॲन्टीजन टेस्ट घेण्यात आली. यामध्ये 11 जण पॉझिटिव्ह आढळून आले तर 369 जण निगेटिव्ह आले. तसेच 316 नागरीकांची आरटीपीसीआरची तपासणी करण्यात आली. महापालिकेच्या 11 प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या भागामध्ये 114 वैद्यकिय पथकाद्वारे व्याधीग्रस्त बालकांच्या घरातील व्यक्तिंची तपासणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *