राशिवडे आरोग्य केंद्र दुरुस्तीसाठी २० लाखांचा निधी : विनय पाटील

राशिवडे बु ( प्रतिनिधी) : राशिवडे बुद्रुक येथे आरोग्य केंद्रामध्ये पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, यांच्या माध्यमातून मिळालेल्या ॲम्बुलन्स चे लोकार्पण राशिवडे मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. तसेच राशिवडे आरोग्य केंद्रामध्ये विशेष दुरुस्तीसाठी विनय पाटील यांच्या  जिल्हा परिषद निधीतून २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.  

      

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून के. डी. सी. सी. बँकेचे माजी चेअरमन कृष्णराव किरूळकर (बापू), तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शेटे, जि. प. सदस्य पांडुरंग भांदीगरे, पंचायत समिती  माजी उपसभापती उत्तम पाटील, दिपक पाटील, अंबाजी पाटील, राशिवडे सरपंच कृष्णात पोवार, उपसरपंच अनिल वाडकर, ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील, राजाराम कांबळे, स्वप्नाली पाटील,  सामाजिक कार्यकर्ते मोहन धुंदरे, प्रकाश धुंदरे, अजित लाड , डॉ. राजेंद्र कांबळे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व  कर्मचारी  आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *