कोरोनाने ३२ जणांचा मृत्यू!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज शनिवारी १४६१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर ३२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजअखेर १४६३३ अॅक्टिव्ह रुग्ण असून २५६७ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज एकूण १४६१ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये आजरा ५२, भुदरगड ३९, चंदगड २६, गडिंग्लज ६२, गगनबावडा १, हातकणंगले २३२, कागल ३१, करवीर २६६, पन्हाळा ८३, राधानगरी ४१, शाहूवाडी १४, शिरोळ ६२, नगर पालिका नगरपालिका क्षेत्रामध्ये १४३ तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये ३२२, तसेच बाहेरील जिल्ह्यातून राज्यातून आलेले रुग्ण ८७ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *