अमेरिकेपेक्षा भारत कोरोना लसीकरणात अव्वल!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  भारतामध्ये लसीकरणाला नागरिकांना भरघोस प्रतिसाद दिला होता. पण पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात लसीचा तुटवडा भासला होता. यावर बोलताना नीती आयोगाचे सदस्य डॉ.व्ही. के. पॉल यांनी दिलासादायक माहिती दिली आहे. डॉ.व्ही.के.पॉल म्हणाले, भारताने आता कोरोना लसीकरणात अमेरिकेलाही मागे टाकले आहे. देशात कोरोना लशीचा पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या अमेरिकेपेक्षा अधिक आहे.

डॉ.पॉल म्हणाले की, भारतात कोरोना लशीचा किमान एक डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या 17.2 कोटी आहे. अमेरिकेत कोरोना लशीचा पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांपेक्षा ही संख्या अधिक आहे. कोरोना विषाणू पुन्हा येणार हे निश्चित आहे. तोपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *