कोल्हापुरात ‘म्युकर’ रुग्णांच्या संख्येत वाढ

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात रुग्ण वाढत असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील ६१ जण सीपीआरमध्ये उपचार घेत असून नजिकच्या काळात आणखी रुग्ण वाढले तर सीपीआरवर देखील मर्यादा येणार आहेत. त्यामुळे म्युकरवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची संख्या वाढवण्याची गरज आहे.

म्युकरच्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी चार तास लागतात. सीपीआरमध्ये अशा शस्त्रक्रिया करणारे तीन डॉक्टर आहेत. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने त्यांनाही या शस्त्रक्रिया वेळेत करण्यावर मर्यादा आहेत. परंतु या आजारावरील उपचारासाठी खर्च जास्त असल्याने, त्याच्यासाठीच्या इंजेक्शन्सची किंमत ६ हजारपर्यंत असल्यामुळे अनेकजण उपचारासाठी सीपीआरला प्राधान्य देत आहेत.

राज्यात म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली.

असे असतील दर

■ वॉर्डमधील अलगीकरण : अ वर्ग शहरांसाठी ४००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ३००० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी २४०० रुपये असा दर निश्चित केला आहे.

■त्यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च व जेवण यांचा समावेश.

■मोठ्या चाचण्या व तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *