कोल्हापुरात दाखल टास्क फोर्स .. !

कोल्हापूर प्रतिनिधी : राज्यात कोरोनाच्या उद्रेकाने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. . महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात देशातील सर्वाधिक मृत्यूदर आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील कोरोना मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक कसे? याबाबत टास्क फोर्सचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे.

यामध्ये टास्क फोर्सनी बाबींचा उलगडा केला आहे त्यामध्ये पहिले कारण सध्या कोल्हापुरात अनेक कोरोनाबाधित रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच घरी त्रास वाढू लागल्यानंतर अनेक रुग्ण हे उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहे. मात्र तोपर्यंत बराच कालवधी निघून गेलला असतो. परिणामी कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे.

दुसरे कारण – तर दुसरीकडे कोल्हापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा बेफिकीरपणा कमी झालेला नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग गावागावात झपाट्याने पसरु लागला आहे. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील कोव्हिड सेंटर कमी पडत आहेत. तसेच व्हेंटिलेटर, ऑक्सिजन या सुविधाही कमी पडत आहे. त्यामुळेही मृत्यूदरात वाढ होत आहे.तिसरे कारण – त्याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच रुग्णालय सध्या हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू होत आहे, असेही कारण टास्कफोर्सने दिले आहे.कोल्हापुरातील टास्क फोर्स यांनी दोन दिवस जिल्ह्यामध्ये रुग्णालयांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील करोना मृत्यूदर कमी करण्यासाठी काही तपशील गोळा केला. तसेच कोल्हापुरातील छत्रपती प्रमीलाराजे रुग्णालय (सीपीआर) व इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयाची पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *